फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप भाजपा-आरएसएसच्या नियंत्रणाखाली, खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवला : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅप भाजपा व आरएसएसच्या नियंत्रणाखाली आहे. त्यांनी या माध्यमातून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवला आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी याचा उपयोग केला आहे. शेवटी अमेरिकन माध्यमाने फेसबुकविषयीचं सत्य उघड केलं आहे, असे म्हणत राहुल गांधींनी भाजपा व आरएसएसवर टीका केली आहे.

 

प्रसिद्ध द वॉल स्ट्रीट जर्नल, फेसबुक भारतात सत्ताधारी भाजपाला अनुकूल भूमिका घेत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या हा अहवालाचा हवाला देत राहुल गांधी यांनी भाजपा व आरएसएसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आलेला वृत्तांत ट्विट केला आहे. या वृत्तांताचा हवाला देत भारतातील फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप भाजपा आणि आरएसएसच्या नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, फेसबुकच्या निष्पक्षतेवर ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कंपनीने भाजप टी. राजा सिंह आणि आनंद हेगडे यांच्या वादग्रस्त पोस्ट हटविल्या आहेत. फेसबुकने भाजप नेत्यांच्या ‘हेट स्पीच’ असलेल्या पोस्टविरोधात कारवाई करण्यास फेसबुक जाणून बुजून कुचराई करत आहे असे जर्नलने म्हटले होते. एका मोठ्या योजनेच्या आड फेसबुक हा भाजप आणि कट्टरतावाद्यांबाबत पक्षपातीपणा करत आहे, असेही जर्नलने म्हटले होते.

Protected Content