एरंडोलच्या डॉ.गितांजली ठाकूर यांना आदर्श आरोग्यसेवक पुरस्कार

fbdce9ee 5f68 4bfd b0b0 6513c4ccc060

एरंडोल (प्रतिनिधी) शहराच्या माजी उपनगराध्यक्षा व नचिकेत इमेजिंग सेंटरच्या संचालिका डॉक्टर गितांजली ठाकूर यांना नुकताच ‘विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श आरोग्य सेवक’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

 

नेहरू युवा केंद्र संलग्न मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशन जळगाव या संस्थेमार्फत वैद्यकीय सेवा प्रबोधन व महिलांच्या आरोग्य विषयक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. यावेळी आ.सुरेश भोळे, आ.चंदुलाल पटेल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण, करीम सालार, मजिद झकेरिया, सरिता माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. ठाकूर अनुपस्थित असल्याने हा पुरस्कार त्यांच्यातर्फे त्यांचे पती नरेंद्र ठाकूर यांनी स्वीकारला. पुरस्काराबद्दल शहरवासियांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Protected Content