Home क्राईम जळगाव येथे पार्कींगमधील दुचाकीची चोरी

जळगाव येथे पार्कींगमधील दुचाकीची चोरी

0
124

bike chori
\

जळगाव (प्रतिनिधी ) शहरातील पीव्हीआर थिएटरजवळ असलेल्या सुशील कलेक्शन समोरून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल चोरून नेल्याप्रकरणी आज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवल संतोष वंजारी (वय २७, रा. दयाराम नगर, वाघ नगर) यांनी २० जून रोजी सायंकाळी ६.३० ते ८.३० वाजेच्या दरम्यान शहरातील पीव्हीआर थिएटरजवळ असलेल्या सुशील कलेक्शन समोर दुचाकी क्रमांक (एम.एच. १९ सीएल ५२५६) पार्किंग करून लावली होती. काम आटोपल्यानंतर ते परत आल्यानंतर दुचाकी जागेवर मिळून आली नाही. याबाबत नवल वंजारी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांन विरोधात दुचाकी चोरी प्रकरणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अमोल विसपुते करीत आहे.


Protected Content

Play sound