युनिटी क्लबतर्फे करण्यात आले बीजारोपण

seed plantation unity club chalisgaon

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील युनिटी क्लबच्या वतीने सीड बँकेच्या माध्यमातून माळरानावर बीजारोपण करण्यात आले.
युनिटी क्लबच्या वतीने शहरात मागील आठवड्यात शहरातील ठिकठिकाणी सीड बँकेच्या माध्यमातून बीज संकलन करण्यात आले होते. यात संकलित झालेल्या फणस, आंबा, जांभूळ, चिंच, चिकू आदी बियांचे माळरान परिसरात व राज्य महामार्गावर रोपण करण्यात आले. निसर्ग जपण्यासाठी व पुढची पिढी सावलीत वाढण्यासाठी सर्वार्थाने एकत्र येवून निसर्ग संवर्धन करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे तसेच बीजारोपणातून वृक्षसंवर्धन झाल्यास निश्‍चितच निसर्ग बहरल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रत्येकाने या चळवळीत सहभागी व्हायला हवे असे युनिटी क्लबच्या सदस्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून सांगितले.

याप्रसंगी मनिष मेहता, कोटस्थाने,प्रवीण बागड,हेमंत वाणी,किरण पाटील,भूपेंद्र शर्मा,निशांत पाठक,विशाल गोरे, पियुष सोनगिरे, निरज कोतकर, राकेश राखुंडे, इशू वर्मा, निलेश सेठी, युवराज शिंपी, पराग बागड, योगेश ब्राह्मणकर, राम येवले, प्रवीण पाटील, स्वप्नील कोतकर आदी पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

Protected Content