एरंडोल येथे आषाढीनिमित्ताने दिंडी व वृक्षारोपण

.jpg

एरंडोल प्रतिनिधी । येथे आषाढी एकादशीनिमित्ताने श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुल या शिक्षण संस्थेतर्फे दिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुख्मिमाई व वारकरी यांचे वेश परिधान केले होते. शहरातील विविध मार्गांनी दिंडी मिरवणूक काढण्यात आली. तसेच, दिंडीच्या समारोप प्रसंगी कैलास परशुराम महाजन, चेअरमन पंकज महाजन, रोहिदास पाटील, पी.जी.चौधरी, प्राचार्य वंदना पवार, गणेश महाजन यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गणेश महाजन, राहुल गोसावी या शिक्षण प्रेमी नागरिकांनी बच्चे कंपनीला बिस्किटं व चॉकलेट वाटप करुन त्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य वंदना पवार, रीम्पल महाजन, विशाखा राजपुत, जयश्री भावसार व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.

याचबरोबर, महात्मा फुले हायस्कुलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ह.भ.प.ए.एन.महाजन होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे उपशिक्षक सचिन महाजन यांनी अभंग गायन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच शाळेच्या विज्ञान शिक्षिका एम.आर.गरुड यांनी वारकरी संप्रदायाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ए.एन. महाजन यांनी आषाढी एकादशीचे महत्व विस्तृतपणे विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमास शाळेच्या उपशिक्षिका आर.जे.महाजन, एस.डी.देशमुख, सी.बी.नवगिरे, जी.एफ.चौधरी, कोळी मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थितीत होते. सुत्रसंचालन डी.एन.चव्हाण तर आभार जी.एफ.चौधरी यांनी मानले आहे. याचबरोबर सर्वांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content