दुचाकीवर चुकीचा नंबर टाकणारा पोलीसांच्या ताब्यात

jilhapeth news

जळगाव प्रतिनिधी । चुकीची नंबर प्लेट असलेली दुचाकी रात्री गस्तवर असलेल्या पोलीसांनी जप्त केली. याबाबत मोटार वाहन कायद्यांतर्गत दुचाकी चालकाविरोधात जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील मानराज पार्क समोरील नवजिवन सुपरशॉपी समोर निलेश निंबाजी इंगळे (वय-36) रा. आसोदा ता.जि.जळगाव हा दुकाची क्रमांक एमएच 19 डीसी 1 क्रमांकाची गाडीवर संशयीत रित्या फिरत असतांना जिल्हा पोलीस स्टेशनचे सपोनि आराक, सफौ मोरे यांना मिळून आला. त्याची व त्याच्या ताब्यात दुचाकीची चौकशी केली असता दुचाकीचा खरा क्रमांक (एमएच 19 डीस 8454) असल्याचे मिळून आले. सोबत दुचाकीवर महाराष्ट्र पोलीसांचा लोगोचे स्टिकर आणि गाडीच्या मागच्या बाजूला लाल अक्षरात पोलीस लिहिलेले आढळून आले. त्याची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशी केली असता दुचाकीचा क्रमांक चुकीचा मीच टाकला असून माझे नातेवाईक पोलीसात असल्याचे सांगितले. पो.कॉ. शेखर पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित निलेश निंबाजी इंगळे यांच्या विरोधात भादवी कलम 171, मोटार वाहन कायदा कलम प्रमाणे जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जितेंद्र सुरवाडे करीत आहे.

Protected Content