हिंदूत्व संबंधित आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सवर बंदी आणा; हिंदू जनजागृती समितीचे निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सवर बंदी आणून आयोजन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज बुधवार १ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येवून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयात डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदूत्व या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सबद्दल देशात असंतोष निर्माण झाला आहे. १२ ते १५ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. यात जगभरातील नामांकिगत विद्यापिठांचा समावेश आहे. या कार्यक्रमात हिंदूंना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याने जगभरातील विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती जाणार आहे, या कार्यक्रमात विद्वतापूर्ण कार्य केल्याचा दावा करणाऱ्यांना सहभागी करून घेतल्याचे आयोजकांकडून सांगण्यात ओ आहे. तसेच बहिष्कार घालणारा नागरीकत्व सुधारणा कायदा यावर चर्चा होणार आहे. 

या कार्यक्रमात हिंदू धर्म आणि हिंदूत्व याविषयी अत्यंत चुकीचा प्रसार करून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे कार्यक्रमातील जे वक्ते किंवा आयोजक भारतीय आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करावी, तसेच या कार्यक्रमात सहभागी होऊ नये या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रशांत जुवेकर यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आहे. 

Protected Content