श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमीमध्ये आषाढीनिमित्ताने विविध कार्यक्रम

 

english school

 

रावेर प्रतिनिधी । श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमी या शाळेत सी.बी.एस.ई.इंग्रजी माध्यमाच्या विभागात आज आषाढी एकादशीनिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले आहे.

यावेळी टाळ, मृदंग, भजन तसेच किर्तनाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता शर्मा यांनी पालखीचे पूजन करुन मुलांना आषाढी एकादशीची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करत त्यांचे कौतुक केले. चिमुकल्यांनी बाल-गोपाळ-वारकरी, प्रत्यक्ष विठ्ठल-रुख्माईचे रुप धारण करुन दिंडीत सहभाग घेतला. आषाढी एकादशी म्हणजे रायनी एकदशी, आषाढी एकादशीला महा-एकादशी सुध्दा म्हणतात. शाळेतील विद्यार्थ्यांनी कोणी विठ्ठल-रुक्मिणीचे तर काही विद्यार्थ्यांनी संत सावता माळी, संत तुकाराम, संत निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अशा वेगवेगळया संतांच्या वेशभूषा परिधान करुन सर्वांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्रीराम पाटील, सचिव स्वप्निल पाटील, शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थ्यांनी सजंना नाईक हिने केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

Protected Content