एरंडोल शहरात विकास कामांचे भूमिपुजन

एरंडोल प्रतिनिधी । आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी शहरातील विकासकामांसाठी चार कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यांच्या हस्ते या कामांना प्रारंभ करण्यात आला.

एरंडोल शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार पाटील यांचे हस्ते करण्यात आले.शहरातील प्रभाग क्र.४ मधील रामचंद्रनगर येथे गटारी सह रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (४० लक्ष रूपये),प्रभाग क्रमांक २ मध्ये जुना धरणगाव रोड ते सावतामाळी नगर पर्यंत गटारी सह रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे ३३ लाख रूपये, प्रभाग क्रमांक २ मधील प्रभाकर (दादाजी) पाटील यांचे घरापासून दिनेश महाजन यांचे घरापर्यंत गटारी सहा रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे १० लाख रुपये, प्रभाग एक मध्ये धरणगाव रस्त्यापासून गट नंबर १०६३ मधून ते ओम शांती सेंटर पर्यंत गटारी सहा रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे १० लक्ष रूपये, असे एकूण ९३ लाखांच्या कामांचा शुभारंभ आ.चिमणराव पाटील यांचे हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाला पारोळा बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, एरंडोल तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, माजी जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले, महिला जिल्हा आघाडी प्रमुख महानंदा पाटील पाटील, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, शालिग्राम गायकवाड, आनंदा चौधरी, कुणाल महाजन, अतुल महाजन, परेश बिर्ला,नितीन बिर्ला, चिंतामण पाटील,अमोल भावसार, कुणाल पाटील, राजेंद्र ठाकुर आदींसह नागरिक उपस्थित होते.

Protected Content