एरंडोल प्रतिनिधी । येथील महात्मा फुले विद्यालयात नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात यश संपादन करणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
शालांत परीक्षेचा निकाल नूकताच जाहीर झाला. या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे व विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये प्रवीण सखाराम बारेला- ८६.४०% प्रथम; राजेश मगन नाईक ८४.००% द्वितीय आणि सागर सखाराम बारेला ८१.८०% मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
या विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय समिती मार्फत करण्यात आला. संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, शालेय समितीचे चेअरमन अरुण माळी, नूतन प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन राजेंद्र राघो महाजन, संचालक रविंद्र शांताराम महाजन, सुदर्शन महाजन, पी. जी. चौधरी, अॅड. मनोहर महाजन व मुख्याध्यापक ए.एन महाजन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यंदा उत्कृष्ट निकाल लागल्या बद्दल. वर्ग शिक्षक एस पी माळी व सर्व शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.