Home Cities यावल फैजपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उत्साह ; दुपारी १२ वाजेपर्यंत ८४.१५ टक्के...

फैजपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उत्साह ; दुपारी १२ वाजेपर्यंत ८४.१५ टक्के मतदानाची नोंद

0
3


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फैजपूर येथे मतदान प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहे. नगरसेवकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला असून, मतदारांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल ८४.१५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

फैजपूर नगरपालिका कार्यालयात उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. रावेर, सावदा, फैजपूर आणि यावल येथील नगरसेवकांनी वेळेत मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या या मतदान प्रक्रियेत लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १०१ मतदारांपैकी ८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४१ पुरुष आणि ४४ महिला मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महिला मतदारांनीही मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवत उत्साह दाखविला.

मतदान केंद्र परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी फैजपूर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाच्या दक्षतेमुळे मतदान प्रक्रिया सुरळीत, शांततेत आणि कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांमध्ये मोठा उत्साह असून, मतदान केंद्रावर लोकशाही प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनाकडूनही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


Protected Content

Play sound