आव्हाणे, ता.जळगाव, संदीप होले | जळगाव जिल्ह्यातील आव्हाणे येथे ‘युवा खासदारांचा, युवांशी संवाद’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यात जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी तरूणाईशी संवाद साधला. यावेळी आपण देश सेवेसाठी राजकारणात प्रवेश केलाय या भावना व्यक्त करत त्यानी तरुणांच्या उत्स्फूर्त प्रश्नांना उत्तरं दिलीत.
पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी आणि त्यांच्या सहकार्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाषणाऐवजी संवाद ठेवल्यामुळे आंनद होतोय असं सांगत या माध्यमातून ग्राम परिवर्तनाला सुरुवात झाली आहे अशी भावना खासदार उन्मेषदादा पाटील यांनी व्यक्त केली.
‘राजकारणात येण्याचा निर्णय कसा घेतला ?’ या प्रश्नावर व्यक्त होतांना “त्यावेळी राजकारणाचा लवलेशही नव्हता. मात्र शेतीसाठी, स्वयंरोजगाराचे काय मार्ग आहेत त्यासाठी कार्यशाळा, महिलांसाठी कार्यशाळा अशा या सामाजिक उपक्रमात सहभाग घ्यावा युवकांसाठी काही कार्यक्रम घेता येतील या विचारातून अनेक उपक्रम केले. आणि एम. एस. ई. बी. चे काही प्रश्न होते त्याच्यावर आंदोलन करणे किंवा काही बंद पडलेले उद्योगातील तर्कशुद्ध कथा या दृष्टिकोनातून काही आंदोलने आणि उपक्रम उभारणे असं करत असताना सामाजिक काम करत असताना खूप मर्यादा आहे असं लक्षात आलं. यातील बदलाचा भाग होण्याचा मी प्रयत्न केला आणि या माध्यमातून मी माझा देश बदलला पाहिजे म्हणून मी ठरवलं की राजकारणाचा सेवा म्हणून उपयोग करता येईल या माध्यमातून राजकारणात प्रवेश झाला.” असे त्यानी सांगितले.
या कार्यक्रमात बोलताना अनेक ‘महाराष्ट्रात राजकीय पक्ष येथे आहेत. पण ज्यावेळेस आमदारकीची निवडणूक लढवली तेव्हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता व्हावं असं तुम्हाला का वाटतं ?’असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. तेव्हा “राजकारणात येण्याचा निर्णय जेव्हा आम्ही घेतला त्या वेळी कुठेही पक्ष न घेता अपक्ष राजकारण करावं असा निर्णय घेतला होता. मात्र नंतर लक्षात आलं की अपक्ष कार्य करत असतांना आपण लढत असतांना संघर्ष करावा लागतो. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यात जाऊनचं आपण बदल घडवू शकतो हे ठरवलं. विविध राजकारण्यांसोबत प्रवास करत असताना अभ्यास केला आणि लक्षात आलं की एका बाजूला राजकीय पक्ष बघितले तर 2g स्पेक्ट्रम घोटाळा सुरू होता, भ्रष्टाचाराने बरबटलेला असा असा देश असं चित्र त्यावेळी जाणवत होतं. मग अशा परिस्थितीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत का जावं असा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यावेळी योग्य वाटलेल्या विचारसरणीवर चालणाऱ्या भारतीय जनता पार्टी एक विचारधारेवर काम करणारा पक्ष आहे असं मला वाटलं त्यांच्यासोबत मी काम करायचा विचार केला. आपण जातीपातीच्या पलीकडे एक समाज म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला वाटत असेल तर मला मत द्या असं आवाहन मी लोकांना केलं आणि या पक्षाच्या माध्यमातून मी काम करण्यास सुरुवात केली. दुसऱ्याच्या कामाला कमी लेखून आपलं काम मोठा होऊ शकत नाही आपण आपल्या कामातून स्वतःला सिद्ध केले पाहिजे असं वाटलं. भाजपासाठी नाही तर भारतासाठी काम करायचं हा निर्णय घेतला.” असे त्यांनी सांगितले.
अटल बिहारी वाजपेयी यांचा आज जन्मदिवस त्यांच्या आठवणींना उजाळा देताना, “आमच्यासारख्या तरुणांना खऱ्या अर्थाने एक आदर्श नेतृत्व, आदर्श व्यक्तिमत्व नसेल अटल बिहारी वाजपेयी आहे. ‘भारत जमी का तुकडा नही जिता जागता राष्ट्रपुरुष है.’ ही अटल बिहारी वाजपेयी यांची कविता यातून ‘हम जियेंगे तो इसके लिये, हम मरेंगे तो इसके लिये’ ही भावना सर्वांच्या मनाला व स्पर्श करते” असे त्यांनी सांगितले.
याचबरोबर केळीला हा फळाचा दर्जा मिळाला पाहिजे, बलून बंधारा, सातबारा उतारावर्रील लाल शिक्का, तृतीयपंथी यांच्यासाठी आरक्षण, विज बील यासह असेक विषयावर शेतकऱ्यांनी प्रश्न विचारली खा. उन्मेष पाटील यांनी त्यावर संवाद साधत समाधानकारक उत्तरं दिलीत.
Video Link :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1592466424439326