देशातील ज्येष्ठांना बुस्टर डोस तर मुलांना लस देण्यात येणार !

नवी दिल्ली वृत्तसंस्था | ओमायक्रॉनच्या संभाव्य सावटाला प्रतिकार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्सला बुस्टर डोस तर मुलांच्या लसीकरणास लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला उद्देशून घोषणा करताना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली. येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यास प्रारंभ होईल. देशात लवकरच नाकाद्वारे दिली जाणारी लस तसेच डीएनए लसही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या नव्या स्वरुपामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र, त्यापासून बचावासाठी कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. याशिवाय, देशातील आरोग्य यंत्रणेतील पायाभूत सुविधा आणि लसीकरणाबाबत माहिती दिली.

३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचार्‍यांना बूस्टर डोस दिला जाणार असल्याचं देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे १० जानेवारीपासून ६० वर्षांवरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, आज अनेक देशांत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे महामारीचे संकट वाढले आहे. भारतातही वेगळी स्थिती नाही. म्हणूनच सावध राहा, सतर्क राहा. मास्कचा वापर अवश्यक करा. हात स्वच्छ ठेवा. विषाणूमध्ये बदल होत असताना, देशातील संशोधनाची क्षमताही वाढली आहे.

Protected Content