कायदा हातात घेतल्यास कडक करावाई करण्याचा धनंजय मुंडेंचा इशारा

बीड वृत्तसंस्था । संपुर्ण देशात सरकारने लॉकडाऊन केले आहे. अशावेळी कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असतांना पोलीस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय कर्मचारी हे अहोरात्र जनतेची काळजी घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांचा सन्मान करा, नियमांचे आणि कायदा हातात घेतल्यास खपवून घेणार नाही, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

लॉकडाऊन मध्ये बाहेर पडलेल्या काही जणांना पोलिसांच्या लाठीचा सामना करावा लागला, काही ठिकाणी तर नागरिकांनी पोलिसांशी वाद घातल्याचेही प्रकार घडले, यावरून धनंजय मुंडे यांनी असा सूचक इशारा दिला आहे.

मुंडे यांनी याबाबत फेसबुक वरून एक पोस्ट केली आहे. नागरिकांनी कोणत्याच परिस्थितीत घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक खरेदी किंवा काही अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडायचे असल्यास त्यासाठी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या ठरवून दिलेल्या वेळेत तेही कुटुंबातील एकच सदस्याने बाहेर यावे. पोलीस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय अधिकारी, कर्मचारी हे सर्वजण अहोरात्र आपला जीव धोक्यात घालून या संकटाशी सामना करण्यासाठी काम करत आहेत. त्यांचा मान सन्मान करावा, त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करावा, कायद्याबाबत आदर ठेवावा व शासकीय सूचनांचे काटेकोर पालन करावे हे सर्वकाही जनतेच्या हिताचेच आहे, कोरोना विषाणूचा सामना घरात राहून व संसर्ग होण्यापासून रोखणे यातूनच केला जाऊ शकतो असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Protected Content