पहूर येथे चढ्या दराने विक्री : तक्रार आल्यास कारवाई- सपोनि परदेशी

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी । जगभरात कोरोना या विषारी व्हायरस थैमान घातले आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी येत्या १४ एप्रिल पर्यंत एकवीस दिवस संपूर्ण भारतात लाॅकडाऊन केले असून संचार बंदिही लागू आहे. तर कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांना घरातच बसून रहाण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

पहूर येथील होलसेल किराणा दुकानांवर किराणा मालाची विक्री चढ्या भावाने होत असल्याचे लक्षात आलेले आहे. त्यामुळे किरकोळ किराणा दुकानदारांनाही याची झळ बसत असून कीराणा माल विक्री करण्यात अडचणी येत आहे. पहूर येथे काही भाजीपाला विक्रेते कांदे आणि बटाटे चढ्या भावाने विकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी पंधरा रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता चक्क चाळीस रुपये किलो तर बटाटा ४० रुपये किलोने विकला जात आहे. शासनाने जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व किराणा आणण्यास व वाहतुकीस परवानगी दिली आहे.  त्यामुळे अशा मालाला अतिरिक्त कोणताही खर्च होत नाही.  तरीही या वस्तूंची जास्तीची किंमत देऊन ग्राहकांकडून विक्रेते लूट करीत आहे.  शेतकऱ्यांकडून हा माल विशिष्ट भावात घेऊन त्याचा जास्तीचा पैसा हे विक्रेते करीत असून यामुळेच की काय या चढ्या भावाचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होत नाही.  यावर प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. दरम्यान तहसिरदार तसेच पुरवठा अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे . पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी हे आपल्या सहकाऱ्यांसोबत साठेबाजी करणे जीवनावश्यक वस्तूंची जास्त दराने विक्री करू नये यासाठी सूचना देत जनजागृती करीत आहेत. तरीही हे विक्रेते कोणालाही घाबरण्यास तयार नाहीत. चढ्या भावाने विक्री करणाऱ्या होलसेल किराणा दूकानदारांवर तसेच चढ्या भावाने भाजीपाला विक्री करणार्काया भाजीपाला विक्रेत्यांकडूनही अडचणींना सामोरे जाणाऱ्या लोकांची होणारी फसवणूक होत असून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.  नागरिकांची तक्रार आल्यास जास्तीच्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर जीवनाश्यक वस्तू कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा सपोनि राकेशसिह परदेशी यांनी  दिला आहे.

Protected Content