मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे रोजगार प्रशिक्षण मेळाव्याला सुरूवात

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांसाठी मोफत रोजगार प्रशिक्षण मेळावा व प्राथमिक चाचणी शिबीराचे आयोजन बुधवार ३ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सकाळी ८.३० वाजेपासून करण्यात आले आहे. या मेळाव्यात सुप्रसिद्ध कार्पोरेट ट्रेनर गोपी गिलबिले व अनिता गिलबिले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

मंगळ ग्रह सेवा संस्था ही सामाजिक जाणिवेची उचित भान असलेली सेवाभावी संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन व राष्ट्रभक्तिपर अनेक कार्यक्रम तथा उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे ‌‘रोजगार प्रशिक्षण मेळावा‌‘ व ‌‘प्राथमिक चाचणी शिबीर‌’ होय. या मेळाव्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. तसेच नव्याने उद्योग तथा व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांनाही मार्गदर्शक दिशा मिळणार आहे. प्रशिक्षणासाठी वा नोकरीसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क नाही. ‘रोजगार प्रशिक्षण मेळावा’ यात पूर्ण वेळ उपस्थित तसेच पात्र उमेदवारास सहभाग प्रमाण पत्र देण्यात येईल. जळगाव येथील मल्टिमीडीया फीचर्स प्रा. लि. चे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य आहे.

अधिक माहितीसाठी ८०८७८७८२३६, ८०८७८७८२३८ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Protected Content