मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प हे आधीच्या सरकारच्या काळात गेले असून आता चुकीचा प्रचार केला जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच राज्यात लवकरच इलेक्ट्रॉनिक क्लस्टर आणि टेक्स्टाईल पार्क होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
राज्यातून प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. याबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. ते म्हणाले की, आमचं सरकार येऊन तीनच महिने झालं तरी चुकीची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याचं खोटं बोललं जात आहे, काही लोकांनी बदनामीचा घाट घातला आहे.
दरम्यान, राज्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर केलं असून भविष्यात महाराष्ट्र हे इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. तसेच टेक्स्टाईल पार्क होणार असून टेक्स्टाईल हबही होणार आहे. येत्या नवीन वर्षात बजेटपर्यंत किंवा त्यावेळी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.