विद्यापीठात एकता दौड व प्लास्टिक संकलन

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने. रन फॉर युनीटी अंतर्गत एकता दौड काढण्यात आली. तसेच स्वच्छ भारत अभियान व प्लास्टिक मुक्ती अभियानाअंतर्गत १० किलो प्लास्टीक संकलित करण्यात आले.

प्रशासकीय इमारतीत सरदार वल्लभभाई पटेल तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील यांनी दिली. रा.से.यो. विभाग व समाजकार्य विभागातील रा.से.यो. यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या एकता दौडीस कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी हिरवी झेंडी दिली.

यामध्ये ६० स्वयंसेवक सहभागी होते. प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे उपस्थित होते. या रा.से.यो. स्वयंसेवकांनी विद्यापीठ परीसरात १० किलो प्लास्टिक संकलित करून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द केले या अभियाना प्रसंगी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज इंगोले, डॉ. कविता पाटील, सहायक कार्यक्रम अधिकारी शरद पाटील, कक्ष अधिकारी कैलास औटी, शिवाजी पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content