मारुळ येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मारूळ येथे ग्रामपंचायतीच्या वतीने 14 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार शिरीष चौधरी व प्रभाकर आप्पा सोनवणे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सय्यद जावेद अहमद यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल/रावेर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र विधानसभेचे तालिका अध्यक्ष आमदार शिरिष चौधरी हे होते. तसेच आमदार शिरिष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जि.प. सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या प्रयत्नातुन व मारुळचे सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे यावल तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद अहमद जावेद अहमद, उपसरपंच सलामत अली सैय्यद आणी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत बौध्द वाड्यामध्ये बौद्ध समाज मंदिर बांधने 7 लाख रुपये, भुमिगत गटार बांधकाम करणे 3 लाख रुपये, रस्ता कॉक्रेटिकरण करणे 4 लाख रुपये असे एकूण 14 लाखांच्या कामाचे भुमिपुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

उदघाटन सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मारूळ येथील संजय गांधी निराधार समिती सदस्य सैय्यद जावेद अहमद, मारूळ कार्यकारी सह.सोसा.चे माजी चेअरमन सैय्यद जियाउलहक, माजी प.स.सदस्य, सरफराज तडवी, वि.का.सह.सोसा.चेअरमन कबिरुद्दीन फारुकी, कॉग्रेस यावल शहर अध्यक्ष कदीर खान, ग्रा.प.सदस्य मुर्तेजाअली सैय्यद,सुलतान पटेल,मतिऊररहेमान पिरजादे,संदीप तायडे, फरहतगंज मशिदीचे चेअरमन नकीब हाजिसाहेब, महाराष्ट्र राज्य ग्रा.रो.से.संघटनेचे कार्याध्यक्ष बाळू तायडे, काँग्रेसचे अल्पसंख्याक यावल तालुका अध्यक्ष इखलास सैय्यद, संजय तायडे, भानुदास मेढे, ठेकेदार विशाल तायडे, सोनु हातकर, श्रीधर तायडे, युवराज इंगळे, कालु तायडे, प्रविण हातकर हे होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमास सनातन तायडे, श्रावण तायडे, सामाजिक कार्यकर्ते हसरत सैय्यद, दिपक के तायडे, संतोष वाघोदे, महेंद्र तायडे, संदेश तायडे, संदीप तायडे, भुषण तायडे, महेंद्र तायडे इत्यादीसह बौध्द उपासक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content