दोन टप्प्यात होऊ शकतात राज्यातील 14 महानगरपालिकांच्या निवडणुका

मुबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील महापालिकांच्या 15 दिवसात निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून त्यासंबंधी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे 14 महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रित न होता दोन टप्प्यात घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

यासबंधी अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार असून ज्या महापालिकांची मुदत संपून सहा महिने किंवा एक वर्ष झालं आहे अशा महापालिकांची निवडणूक ही पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार आहे तर नुकतीच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणूक ही दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. एकत्रित निवडणूक घेतल्यास राज्य निवडणूक आयोगावर तसेच शासकीय यंत्रणेवर ताण पडू शकतो. त्यामुळे अशी रणनीती आखण्याचं काम सुरु असल्याची माहिती आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दणका दिला आहे. राज्य सरकारनं केलेला कायदा फेटाळत 15 दिवसांत निवडणुका जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्यातील 14 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आता लवकरच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला 15 दिवसांत निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर निवडणूक आयोगाच्या कामाला वेग आला आहे. महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे आदेश –   

11 मे अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण

12 मे पर्यंत प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यता पाठवावी

17 मे अंतिम प्रभाग रचना अंतिम प्रसिद्ध करावी

17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना यादी शासन राज पत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.

राज्यातील मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नवी मुंबई वसई विरार, नागपूर, अमरावती, उल्हासनगर कोल्हापूर अकोला सोलापूर नाशिक, पिपंरी चिंचवड, महापालिकांना पत्र पाठवले आहे

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!