मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला धक्का देत या पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह हे तात्पुरते गोठविण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोग धनुष्यबाण हे चिन्ह नेमके कुणाचे याबाबत निर्णय घेण्यावर प्रक्रिया सुरू आहे. यात दोन्ही बाजूंकडून युक्तीवाद सादर करण्यात आले. शिवसेनेची मालकी ही आपलीच असा दावा दोन्ही गटांनी केला आहे. यातच आज दुपारपर्यंत चिन्हाच्या मालकीबाबत कागदपत्रे सोपविण्यात आली होती.
दरम्यान, यानंतर रात्री केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याचा निर्णय इलेक्शन कमिशनने घेतला आहे. सोमवार पर्यंत दोन्ही गटांनी आपापल्या निशाणीचे प्रस्ताव सादर करायचे आहेत. यावर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. मुळे दोन्ही गटांना आता हे चिन्ह वापरता येणार नाही. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांचा या चिन्हावर दावा करता येणार नाही. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नव्या चिन्हासाठी तीन पर्याय ठाकरेंना सादर करावे लागतील. तसंच शिवसेना हे नावही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना वापरण्यास तूर्तास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, आजच्या निर्णयामुळे शिवसेनेला धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे.