संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले दुसरे अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशानाच्या काळात कलम ३७० रद्द केल्यानंतरची जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, आर्थिक मंदीसदृश परिस्थिती, बेरोजगारीसह नागरिकत्व (सुधारणा) विधेयकावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

 

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आयोजित सर्वपक्षीय बैठकीला रविवारी २७ पक्ष उपस्थित राहिले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सांसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी होते. दरम्यान, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, की या अधिवेशनात आर्थिक मंदी, काश्मीर, रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा व्हायला हवी. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करेल. गेल्या अधिवेशनासारखेच हे अधिवेशनही यशस्वी ठरावे, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

Protected Content