भाजपकडून होतंय लोकशाहीच्या संस्था उद्धस्त करण्याचं काम – शरद पवार

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही रकार पाडण्याचा प्रयोग राबवला जात असून भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्धस्त करण्याचं काम सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

याविषयी बोलतांना ते म्हणाले की, “बंडखोरांकडे राज्यातील सरकार पाडण्यासाठी काही ठोस कारण नव्हतं. महाविकास सरकार पाडण्यासाठी काही निश्चित कारण नव्हतं. कुणी ईडीचे, कुणी राष्ट्रवादीचे, कुणी हिंदुत्वाचं कारण सांगतं. ही सर्व कारणं सुरतला गेल्यानंतर ठरली असून त्या आधी तसं काही कानावर आलं नव्हतं. त्यामुळे बंडखोरांनी जनतेसमोर येत कारण स्पष्ट करावं, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
शरद पवार हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी बोलताना म्हणाले की, “आम्ही अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी अशी राज्यपालांकडे मागणी केली होती, ती काही त्यांनी मान्य केली नाही. त्यांच्याकडे बहुतेक खूप काम असेल. पण दुसरं सरकार आलं आणि त्यांनी ही मागणी ४८ तासामध्ये मान्य केली. असं करणारे आपले पहिलेच राज्यपाल असतील.” असा टोलाही त्यांनी राज्यपाल यांच्यावर केली.

Protected Content