जामनेरातील भुयारी गटार सांडपाणी प्रक्रिया योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न.

जामनेर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर नगर परिषदे अंतर्गत संपूर्ण शहरासाठी वरदान ठरणारा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत जामनेर शहरात भुयारी गटार व सांडपाणी प्रक्रिया योजनेचा लोकार्पण सोहळा आज माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला.

सुमारे 68 कोटी रुपयाच्या या प्रकल्पाचा आज शुभारंभ करण्यात आला .यावेळी नगराध्यक्ष सौ .साधनाताई महाजन, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले ,उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील,नाना बाविस्कर, यांच्यासह सर्व नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

या योजनेविषयी माहिती देताना आमदार गिरीश महाजन म्हणाले की, “भुयारी गटार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अंतर्गत गावातील सर्व सांडपाणी नदीत यायचे त्यामुळे हेच पाणी विहिरीत पसरून दुर्गंधी व रोगराई पसरत होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा निर्माण झाला होता. म्हणून ही योजना आपण मंजूर केली. जवळपास ६६.५४ कोटी रुपये खर्चाची ही योजना आज पूर्णत्वास आली असून पिकांना उपयुक्त पाणी यापुढे मिळणार आहे. त्यामुळे पुढे बंधारा बांधून हे पाणी शेतीसाठी दिले जाईल असेही माहिती आमदार गिरीश महाजन यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, “या योजनेअंतर्गत शेतीला उपयुक्त पाणी मिळणारच आहे परंतु याच बरोबर यापुढे दुर्गंधीयुक्त पाणी कायमचे बंद होऊन या योजनेअंतर्गत स्वच्छ शहर ही संकल्पना पूर्णत्वास आली आहे. ही सेवा 24 तास सुरू राहणार असून गावातील येणाऱ्या घाण पाणी ,सांडपाणी यावर प्रक्रिया करून शुद्ध करून नदीमध्ये सोडले जाणार असून हेच पाणी शेतीसाठी वापरले जाईल.”अशी माहिती आमदार महाजन यांनी दिली.

यावेळी आमदार महाजन यांच्या हस्ते विवेकानंद नगर सामाजिक सभागृहाचे बांधकाम लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्याचबरोबर जामनेर पुरा सामाजिक सभागृह बांधकाम व्यायाम शाळा लोकार्पण सोहळा, इंदिरा आवास बंदिस्त गटार भूमिपूजनही त्यांच्याहस्ते करण्यात आले .

यावेळी नगरसेवक नाना बावस्कर भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीराम महाजन, नगरसेवक अतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, संध्या पाटील, शितल सोनवणे, नवल पाटील, लीना पाटील, किरण पोळ, ज्योती पाटील, सुहास पाटील, जयेश पाटील, उल्हास पाटील, कैलास नरवाडे, तालुका उपाध्यक्ष दीपक महाराज, तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, उप मुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, बांधकाम अभियंता आर.डी.सूर्यवंशी, भैय्या पाटील, श्रीकांत भोसले, सुरज पाटील, भूषण वर्मा, संदीप काळे, शशिकांत लोखंडे, नवल पटेल, चिराग भाई आदी कार्यकर्ते पदाधिकारी व नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content