अखेर शेंदुर्णीच्या सफाई कर्मचार्‍यांचा संप मागे !

शेंदुर्णी, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथीला नगरपंचायतच्या अंतर्गत कार्यरत असणार्‍या सफाई कर्मचार्‍यांनी अखेर अकराव्या दिवशी आपला संप मागे घेतला आहे.

शेंदूर्णी नगरपंचायत कर्मचार्‍यांनी गेल्या ११ दिवसापासून कामबंद आंदोलन पुकारले होते. याच्या अंतर्गत कडक उन्हात सर्व कामगार उपोषणाला बसलेले होते. दरम्यान, काल संध्याकाळी साडेसहा वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय गरूड ,भाजप नेते गोविंद अग्रवाल, मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय गरूड, माजी सरपंच सागरमल जैन,शांताराम गुजर,सुधाकर बारी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन कामगारांच्या मागण्या समजून घेतल्या तसेच नगरपंचायत स्थरावरील मागण्या विषयी मुख्याधिकारी साजिद पिंजारी , भाजपचे नेते गोविंद अग्रवाल यांच्याशी विस्तृत चर्चा करून नगरपंचायत स्तरावरील मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी आग्रह धरला. त्यास मुख्याधिकारी यांनी प्रतिसाद दिला. ग्रामपंचायत काळातील सफाई कर्मचारी यांचा प्रॉव्हिडंट फंड याच महिन्यापासून प्रत्येक महिन्यात ५ कर्मचारी याप्रमाणे ४ महिन्यात देण्याचे मान्य केले , साप्ताहिक सुटी व अन्य मागण्या मान्य केल्या.

मागण्या मान्य झाल्यानंतर सफाई कर्मचार्‍यांनी आपल्या उपोषणाची अखेर सांगता केली. यावेळी देविदास निकम,संजय निकम, विश्वनाथ उसे, अजय निकम, नगरसेविका पती फारुख खाटीक,योगेश गुजर इत्यादी उपस्थित होते.

Protected Content