पाचोरा-भडगाव शहराच्या विकासासाठी निधी देण्याचे नगरविकास मंत्र्यांचे आश्वासन (व्हिडिओ )

 

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा – भडगाव शहराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.  यात पाचोरा शहरातील भुयारी गटारी व रस्त्यांच्या काॅंन्करेटीकरणासाठी १२८ कोटी रुपये मंजुर करण्यात आले असून यातील पहिल्या टप्प्यात ४३ कोटी ८० रुपये निधी मिळण्यासाठी अंदाज पत्रक तयार करून प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याने या कामास एक महिन्याच्या आत सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पाचोरा शहरात सन २००७ पासुन भुयारी गटारी व पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले असुन यातील काही काम अपुर्ण अवस्थेत असल्याने गेल्या १४ वर्षांनंतर शहरात अनेक नविन काॅलन्या व लोकसंख्या वाढली असुन सुमारे २५ टक्के शहर वाढल्याने यापुर्वीचा मिळालेला निधी अपुर्ण पडत असल्याने आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आॅनलाईन पद्धतीने मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर बैठकीत चर्चा केली.  या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, भडगावचे मुख्याधिकारी विकास नवाडे उपस्थित होते. 

आमदार पाटील यांच्या निवासस्थानी आज झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, मुकुंद बिल्दीकर, नगरसेवक शरद पाटे, वाल्मिक पाटील, धर्मेंद्र चौधरी, बापु हटकर, शहर अध्यक्ष किशोर बारावकर,  तालुका प्रमुख शरद पाटील, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, नाना वाघ, दिपक पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले की, पाचोरा शहरात गेल्या ४ ते ५ वर्षांपासून भुयारी गटारीचे काम सुरू असल्याने रस्त्यांची अतिषय दयनिय अवस्था झाली आहे. शहरातील नागरिकांनी जे सहकार्य केले. त्याबाबत त्यांचे कौतुक करण्या सारखे आहे. पहिल्या टप्प्यासाठी ४३ कोटी ८० लाख रुपये निधी तुन रेल्वे लाईनच्या पुर्वीकडील भागाच्या रस्त्यांचे काॅंन्क्रेटीकरण केले जाणार असुन दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या निधीतुन रेल्वे लाईनच्या पश्मिमेकडील उत्तर व दक्षिण भागातील भुयारी गटारी व रस्त्यांच्या काॅंन्क्रेंटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. याशिवाय श्मशानभुमी जवळील हिवरा नदीवरील पुल आणि कृष्णापुरी जवळील पुलाच्या उंचीकरणासाठी निधी उपलब्ध झालेला असल्याने या दोन्ही पुलांची कामे महिना भराच्या आत सुरू होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

भडगाव शहरासाठी पाणी पुरवठा व गिरणा नदी पात्रावरील पुलासाठी विशेष निधी

भडगाव शहरातील रस्त्यांच्या काॅंन्क्रेंटीकरणासाठी ४ कोटी ४५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असुन गिरणा नदीवरील पुलासाठी ७ कोटी १४ लाख रुपये निधी मिळण्यासाठी नाशिक येथे अंदाजपत्रक पाठविण्यात आले आहे. याशिवाय भडगाव पालिकेच्या अग्निशमन दलाच्या वाहनांवर लवकरच फायर फायटरची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/248453146841189

 

Protected Content