सोमवारपासून यावल आगाराची माहूरगड बस सेवा होणार पूर्ववत

 

यावल प्रतिनिधी । कोरोना काळात बंद ठेवण्यात आलेली बस सेवा सुरळीत करण्यात आली आहे. भाविकांनी माहूरगडसाठी देखील बस सेवा पुन्हा  करण्याची मागणी केली असून त्यानुसार यावल येथून सोमवारपासून पूर्ववत सुरु करण्यात येणार आहे. 

शासनाने  अनलॉक जाहीर केल्याने महामंडाळाने सर्वत्र एसटीची बससेवा ही पुर्वरत केली आहे.  यावल आगारातुन सुटणारी यावल ते माहुरगड मुक्ताईनगर , मलकापुर , बुलढाणा , चिखली , मेहकर, वाशिम , पुसद अशी ३८० किलोमिटरचा प्रवास करीत ही माहुरगडला जाणार आहे. अनेक दिवसांपासुन यावल आणि परिसरातील शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची यावल ते माहुरगड बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी असतांना भाविकांच्या श्रद्धेचे आदर करीत सोमवार दिनांक ८ फेब्रुवारी  सकाळी ७.३० वाजता ही बससेवा पुनश्च सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावल आगाराचे व्यवस्थापक एस. व्ही. भालेराव यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना दिली. 

 

 

 

Protected Content