Home Cities भुसावळ अखेर तापी पुलाजवळच्या रस्त्याचे उजळले भाग्य !

अखेर तापी पुलाजवळच्या रस्त्याचे उजळले भाग्य !

0
35


भुसावळ प्रतिनिधी । दररोज हजारो वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनलेल्या तापी नदीच्या पुलाजवळच्या रस्त्याचे काम अखेर सुरू करण्यात आले असून यामुळे येथून ये-जा करणार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भुसावळ येथील तापी नदीच्या पुलाजवळील यावल रस्त्याचे कामाला सुरुवात झाली असून गेल्या अनेक महिन्यापासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते.
संबंधित ठेकेदाराला या रस्त्याचे काम मिळाल्यानंतर निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे काही काही लोकप्रतिनिधींनी आरोप केला होता. त्यानंतर लॉक डाऊन मुळे पुन्हा या रस्त्याचे काम खोळंबले होते. त्यातही जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते मात्र खडी टाकल्यानंतर पुन्हा हे काम रखडले त्यामुळे परिसरातील नागरिक व वाहनधारक या रस्त्यामुळे त्रस्त झाले होते. अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून स्थानिक नागरिकांनी वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. तथापि, हे हा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा ही अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound