जळगावात “विश्व लेवा गणबोली दिन” उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । आज जळगावात निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी ‘विश्व लेवा गणबोली दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. दरम्यान, बहिणाबाई उद्यानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, दि.२८ नोव्हेंबर रोजी  लेवा गणबोली साहित्य मंडळ, जळगाव  या संस्थेने आयोजित केलेले दुसरे लेवा गणबोली साहित्य संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. त्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ‘बहिणाईंची गाणी’ मुळे लेवा गणबोलीला वैश्विक ओळख मिळाली म्हणून तीन डिसेंबर,बहिणाबाई पुण्यतिथी ‘ विश्व लेवा गणबोली दिन ‘ म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. त्याला अनुसरून आज ” विश्व लेवा गणबोली दिन ” म्हणून आज  हा दिवस साजरा करण्यात आला.प्रारंभी लेवा गणबोली साहित्य मंडळाचे सचिव कवी व कलावंत तुषार वाघुळदे यांनी उपस्थितांना ठराव वाचून दाखविला. कवयित्री बहिणाबाई यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून , पुष्पांजली वाहून अभिवादन केले. तुषार वाघुळदे व सुरेश कोल्हे यांनी पुतळ्याचा परिसर स्वच्छ केला. या सर्व समावेशक कार्यक्रमाला अनेकांनी आवर्जून हजेरी लावली.

आमदार सुरेश भोळे म्हणाले की ,” बहिणाबाईंची काव्यसंपदा ही जागतिक पातळीवर पोहचली आहे ,ही बाब अभिमानाची म्हणावी लागेल. जीवनाचे तत्वज्ञान त्यांच्या कवितेत भरलेले आहे “. तुषार वाघुळदे यांनी ” बहिणाबाई यांचे  साहित्य व त्यात असलेली कृषिसंस्कृती आणि त्याद्वारे समाजाला मिळत असलेली प्रेरणा हे खुप अमूल्य आहे.सहज सोप्या भाषेत असे त्यांचे अक्षर लेणं आहे “, असे श्री.वाघुळदे यांनी सांगितले. कवयित्री ज्योती राणे ,अशोक पारधे यांनी काव्य सादर करून टाळ्यांची दाद मिळवली.

याप्रसंगी महापौर जयश्री महाजन ,माजी महापौर सीमाताई भोळे ,दीप्ती चिरमाडे ,गोविंद पाटील ,सुनील चोपडे , नरेंद शिवदे ,अशोक पारधे , अभिजित पांडे , चंद्रकांत वांद्रे ,अनिल पाटील , विपीन बेंडाळे

किशोरी वाघुळदे ,डॉ.जितेंद्र कोल्हे, संजीव पाटील ,ललित धांडे , प्रकाश चौधरी, सुनील सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.आजचा कार्यक्रम जेष्ठ साहित्यिक डॉ.अरविंद नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले.कार्यक्रमास साहित्यिक, साहित्य व कलाप्रेमी यांची उ

Protected Content