रिंगरोड परिसरात कुलूपबंद घरफोडीतील दोन अल्पवयीन मुलांना अटक

जळगाव प्रतिनिधी । रिंगरोड परिसरातील दिनानाथवाडी परिसरात कुलूपबंद घर फोडून अज्ञात चोरटयांनी सुमारे साडे पंधरा हजार रूपयांचा चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना मार्च २०२० ते जून दरम्यान घडली होती. या प्रकरणी दाखल गुन्हयात जिल्हापेठ पोलिसांनी तपास चक्रे फिरवून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १० हजाराचे दागिणे हस्तगत केले.

याबाबत माहिती अशी की, सहायक कृषी अधिकारी अनिल किशोर पाटील हे दिनानाथवाडी येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते घराला कुलूप लावून कुटुंबासह मार्च महिन्यात गावाला गेले होते. दरम्यान हे कुलूप घर हेरून चोरटयांनी कडीकोयंडा तोडून घरातील सुमारे १५ हजार ५०० रूपयांचे चांदीचे दागिणे लांबविले. प्रकार कळाल्यानंतर अनिल पाटील यांनी या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घरीफोडी गुन्हे उघडकीस आणण्याकामी सहायक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाने तपासाला गती दिली. गोपनीय माहितीनुसार सदर गुन्हयातील संशयीत हे तांबापूरातील असल्याचे कळाले. त्यानुसार पोलिसांनी गुरूवारी तांबापुरात शोध घेतला असता बिलाल चौकात दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी १० हजाराचा ऐवज जप्त केला. तर अन्य रक्कम खर्च केल्याचे सांगीतले. प्रविण भोसले, नाना तायडे, प्रशांत जाधव, अविनाश देवरे, हेमंत तायडे, इम्रान सैय्यद, गोविंदा पाटील या जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे

Protected Content