पारोळा / एंरडोल मतदार संघाच्या मतदार यादीत फेरफारचा प्रयत्न : चंद्रकांत पाटील

पारोळा प्रतिनिधी | “पारोळा / एंरडोल मतदार संघाच्या मतदार यादीत फेरफार करण्याचा प्रयत्न होत असून यादीची पळताडणी आणि चौकशी करून कार्यवाही करावी.” असे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पारोळा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

“निवडणूक आयोगाकडून १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत मतदान पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका डोळयासमोर ठेऊन काही मंडळी पारोळा / एंरडोल मतदार संघाच्या मतदार यादीत ग्रामीण भागातील व शहरातील इतरस्त्र वास्तव्यास असलेल्या मतदारांची नावे आपल्या सोईनूसार स्थंलातर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मतदार यादीची पळताडणी करून या प्रकारास आळा बसवावा व चौकशी करून कार्यवाही करावी.” असे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील व मित्र परीवार यांनी पारोळा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

Protected Content