Home राजकीय देवेंद्र फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत- भय्याजी जोशी

देवेंद्र फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत- भय्याजी जोशी

0
130


Devendra Fadnavis 1

नागपुर वृत्तसंस्था । देवेंद्र फडणवीस हे फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नसल्याचे सूचक वक्तव्य संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी आज केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नागपुरात साधना बँकेचा लोकार्पण सोहळ्यात भय्याजी जोशी म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत. तसंच त्यांना फार काळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही. त्यांचे नशीब मोठे आहे. देवेंद्रजी यांच्या भाग्यात विरोधी पक्षनेता हा जास्त दिवसांचा विषय नाही. तसेच माजी मुख्यमंत्रीपदीह अल्पायु आहे. लोकशाहीत कमीअधिक घडत असते असे जोशी म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमात जेव्हा भय्याजी जोशी यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा देवेंद्र फडणवीस हेदेखील मंचावर उपस्थित होते.


Protected Content

Play sound