राज्यसभेसाठी १६ जागांसाठी निवडणूक : उद्या मतदान

अज्ञात सुरक्षित जागेवर असलेल्या आमदारांना थेट मतदानावेळीच आणले जाणार

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेसाठी महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटकसह हरियाणा अशा ४ राज्यात अटीतटीची निवडणूक होत आहे. विशेषत: महाराष्ट्रात सत्तारूढ महाविकास आघाडीतील शिवसेना आणि भाजपा मध्ये सहाव्या जागेसाठी चुरस असून देशात १६ जागांवर निवडणूकीसाठी उद्या १० जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

राज्यसभेच्या मुदत संपूष्टात येत असलेल्या ५७ जागांसाठी ३१ मे रोजी नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. त्यापैकी ४१ जागांसाठी उमेदवार बिनविरोध निवडण्यात आले. उर्वरित १६ जागांसाठी १० जून रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागासाठी मविआतील राष्ट्रवादी, काँग्रेसचे प्रत्येकी एक,  शिवसेनेचे दोन तर भाजपचे तीन असे ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक आणि भाजपचे दोन असे उमेदवार निवडून येण्यासाठी पुरेसे संख्याबळ असून पाच उमेदवार राज्यसभेवर पाठवले जातील. परंतु सहाव्या जागेवर शिवसेनेने संजय पवार आणि भाजपने धनंजय महाडीक यांना कोल्हापुरातूनच उमेदवारी दिली आहे. आणि याच जागेवरून रस्सीखेच सुरु आहे.

अशीच परिस्थिती राजस्थानमध्ये ४, हरियाणात २ आणि कर्नाटकात ४ जागांसाठी रस्सीखेच असून प्रत्येक पक्षाने त्यांचे आमदार सुरक्षित आणि अज्ञात ठिकाणी रवाना केले असून उद्या त्यांना थेट मतदानाच्या वेळीच आणले जाईल.
अपक्ष एमआयएम आणि लहान पक्ष आमदारांच्या मतावर सर्वच पक्षांची भिस्त असल्याने यावेळी मनधरणी बैठका करीत त्यांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यानंतर उद्या अपक्ष एमआयएम आणि लहान पक्ष आमदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात हे मतदानानंतर त्याच दिवशी कळणार आहे.

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!