‘त्या’ बालकाच्या कुटुंबाचे रावेर पदाधिकाऱ्यांकडून सांत्वन

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तुटलेल्या वीज तारांना स्पर्श झाल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना खिरोडा येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार उषाराणी देवगुणे, आ. शिरीष चौधरी व पोलीस अधिकार्‍यांनी कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.

सावदा खिरोदा येथील बेघर वस्तीत काल दुपारी झालेल्या चक्रीवादळामुळे विजेच्या तारा तुटल्याने लहान साडेतीन वर्षांच्या तडवी मुलाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनास्थळी पाहाणी करताना कर्तव्यदक्ष अधिकारी उषाराणी देवगुणे, खिरोदा सर्कल श्री बंगाले, तलाठी सावदा पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी गायकवाड यांच्यासह आमदार शिरीष चौधरी, सहाय्यक भानुदास मेढे, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे, उपसरपंच सावखेडा अल्लादिन तडवी, महेंद्र पाटील गौरखेडा ग्रामपंचायत सदस्यांसह अनेकांनी सदर कुटुंबाला सहानुभूती देवून लवकरात लवकर शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!