ऐशी वर्षीय वृध्द झाले बेपत्ता; पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील तांबेपूरा भागात राहणारे ८० वर्षीय वृध्द व्यक्ती हे मंदीरावर जात असल्याचे सांगून शुक्रवारी २७ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेपासून बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रविवारी २९ जून रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मधूकर संजय पाटील वय ८० रा. तांबेपूरा जळगाव असे बेपत्ता झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

अमळनेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील तांबेपूरा भागात मधुकर पाटील हे वृध्द आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी २७ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता महादेव मंदीरात जात आल्याचे सांगून ते घरातून निघून गेले. त्यानंतर ते घरी परतले नाही. दरम्यान त्यांच्या घरातील सदस्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांच्या नातेवाईकांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यानुसार रविवारी २९ जून रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद भोई हे करीत आहे.