बोदवड येथील कोवीड सेंटर व लसीकरण केंद्राला खा. रक्षा खडसे यांची भेट

बोदवड प्रतिनिधी । शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटर व लसीकरण केंद्राला खासदार रक्षा खडसे यांनी आज भेट घेतली. रूग्णालयातील सुविधा व समस्यांसह आदी माहिती जाणून घेतली. 

बोदवड येथील कोवीड केअर सेंटर आणि लसीकरण केंद्राला खासदार रक्षा खडसे यांनी आज भेट दिली. रूग्णांशील प्रत्यक्ष संवाद साधुन उपलब्ध सुविधा, ऑक्सिजन संदर्भात माहिती जाणून घेतली. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांच्याशी चर्चा करून आवश्यक त्या सुचना देण्यात आल्यात. दरम्यान, सौम्य लक्षण असलेले कोविड रुग्ण जे  घरी उपचार घेत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेऊन ते बाहेर फिरणार नाही. याबाबत गावात नगरपरिषद व ग्रामपंचायत मार्फत दवंडी देण्याच्या तहसिलदारांना सूचना केल्या. यावेळी तहसिलदार घोलप साहेब, मुख्याधिकारी भोसले साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, भाजप तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष विक्रम वरकड, सरचिटणीस अमोल शिरपूरकर, अमोल देशमुख, राजू डापसे, शहर अध्यक्ष नरेश अहुजा इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.