रावेरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मॉलवर दंडात्मक कारवाई

रावेर प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश असतांना शहरातील एका भागात नियमांचे उल्लंघन करत कापड मॉलमध्ये छुप्या पध्दतीने व्यवहार करणाऱ्या दुकानदारांवर नगरपालिकेने आज दंडात्मक कारवाई केली आहे. 

अधिक माहिती अशी की, शहरातील रूपम शॉपींग मॉलचे मुख्य शटर बंद ठेवून लहान दरवाजातून ग्राहकांना आत मध्ये घेवून गर्दी करत असल्याची माहिती स्थानिक नगरपरिषद अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार आज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लांडे यांनी स्थानिक पोलीसांच्या मदतीने दुकानावर छापा टाकला. दरम्यान दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त करण्यात आला आहे. दरम्यान किती ग्राहक होते यांची चचपणी करून प्रत्येक ग्राहकाप्रमाणे ५०० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्याधिकारी लांडे यांनी दिली.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.