खा. संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ९ नोव्हेंबरला सुनावणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता ९ नोव्हेंबरला सुनावणी होणार असून न्यायालयाने जामिनावरील निकाल राखून ठेवला आहे.

खासदार संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना एचडीआयएल ग्रुपकडून ११२ कोटी रुपये मिळाले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांच नाव सुरुवातीला समोर आले होते आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती.

संजय राऊत यांच्या जामिन अर्जावर आता ९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने बुधवारी लेखी उत्तर सादर केले. जामिनावरील निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे. विशेष म्हणजे प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी होणार ओह. कोर्टाने जामिनावरील निकाल राखून ठेवला आहे.

 

Protected Content