Home क्राईम किरकोळ कारणावरुन दोन गटात हाणामारी

किरकोळ कारणावरुन दोन गटात हाणामारी

0
103


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । किरकोळ कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना खंडेराव नगरात घडली. यात दोन्ही गटातील तरुण जखमी झाले असून दोघांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील खंडेराव नगरात संतोष गंगाराम भोई हा तरुण वास्तव्यास आहे. दरम्यान, याच परिसरातील लतीफ पिजारी याला संतोष आमच्या भांडणात पडू नको असे बोलल्याने त्याला वाईट वाटले. दरम्यान लतिफ पिंजारी यांनी संतोष भोईला मारहाण केली. तसेच रस्त्यावर पडलेली विट संतोषच्या डोक्यात टाकून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी संतोष भोई यांच्या तक्रारीवरुन लतिफ पिंजारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निलेश पाटील हे करीत आहे.

तर दुसर्‍या गटाने दिलेल्या तक्रारीवरुन लतिफ पिंजारी यांना त्यांच्या परिसरातील गिरीष घुगे, समाधान भोई, संतोष भोई यांनी तुला जास्त झाले आहे का? असे बोलल्याच्या कारणावरुन तिघांनी पिंजारी यांना मारहाण केली. तसेच धारदार वस्तूने त्यांच्या छातीवर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी लतिफ पिंजारी यांच्या तक्रारीवरुन गिरीष किशोर घुगे, समाधान हरचंद भोई, संतोष गंगाराम भोई तिघ रा. खंडेराव नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निलेश पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound