अवकाळी पावसामुळे पळासदळ व धारागीर शिवारात गव्हाचे मोठे नुकसान

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील पळासदळ शिवार व धारागिर शिवारात रात्रीचा अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे गहू या पिकांचे मोठे नुकसान होऊन ते जमीनदोस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचा तोंडांशी आलेला घास या अवकाळी पाऊस व वाऱ्याने हिरावून घेत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

खरीप हंगामात पावसाचा लहरीपणामुळे कापसाचे सरासरी उत्पादन हे कमी आले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांचा पूर्ण खर्च ही निघाला नसल्याचे कटू अनुभव आहेत. ते दुःख वीसरून त्याने आशे पोठी रब्बी हंगामा साठी पुन्हा जुगार खेळून गहू, हरभरा, मका, ज्वारी, भुईमूग यांची हजारो रुपये खर्च करून पेरणी केली आहे. त्यात आगात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गवाला शेवटचे पाणी देणे बाकी असताना रात्री 1 वाजेच्या सुमारास पळासदळ शिवार, धारागिर शिवार या भागात अचानक अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्याने निसलेला व कंबर पर्यंत वाढलेले गहू जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पहाटे हे नुकसान पाहून शेतकऱ्याना कमालीचा धक्का बसला आहे. कर्ज काढून पिकपेरणी करणाऱ्या या शेतकरी कमालीचा दुःखी झाला असून तो मानसिक तणाव व नैराश्याने घेरला गेला आहे. एका रात्रीत होत्याचे नव्हते झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शालीग्राम चौधरी, विमलबाई चौधरी, रवींद्र पाटील, अशोक चौधरी आदी शेतकऱ्यांनी केली आहे. 

प्रशासन कडून पाहणी

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार,अर्चना खेतमाळीस, तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे यांना फोनद्वारे माहिती दिली आहे. त्याअनुषंगाने शिवारातील तलाठी दीपक ठोंबरे, कृषी सह्ययक विजेंद्र महाजन आदींनी या नुकसानीची पाहणी केली असून तसा प्राथमिक नुकसान अहवाल सादर करण्यात येणार आहे. दरम्यान या नुकसानीचे आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

 

Protected Content