पारोळा येथे बाजार समितीच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

पारोळा प्रतिनिधी । कृषी उत्पन्न बाजार समिती वतीने 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

यावेळी आमदार चिमणराव पाटील यांची उपस्थिती होती. पत्रकारिता ही समाजावर देशावर प्रभाव पाडणारे व समाजमत आणि देशमत घडविणारे मोठे क्षेत्र आहे.तसेच राजकीय क्षेत्र देखील प्रभाव पाडणारे मोठे जबाबदारीचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र बिघडली तर देशाची मोठी हानी होण्याची भीती आहे.सध्याचे जिल्यातील राजकीय क्षेत्र हे देखील वैचारिक मतभिन्नता वरून व्यक्तिगत हानीवर जाऊन राजकीय सूड नाट्यकडे वळत असल्याची खंत आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त करून चिंता व्यक्त केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती वतीने 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी ते अध्यक्षीय भाषणातून आपले मनोगत व्यक्त करत होते. सभापती अमोल पाटील उपसभापती दगडू पाटील, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन अरुण पाटील, मधुकर पाटील, डॉक्टर पि के पाटील, सचिव रमेश चौधरी, अशोक मराठे सह पदाधिकारी हे उपस्थित होते. आमदार चिमणराव पाटील म्हणाले की राजकारण हे समाजाच्या जनकल्याणासाठी असते समाजाची उंची वाढविण्याची त्याची ती जबाबदारी आहे. परन्तु आजचे राजकारण हे नकोशा दिशेने जाऊन ते सुडनाट्य झाले की काय असे चित्र निर्माण झाले आहे. ईडी सीडी प्रकारावरून सत्ता ही बदला घेण्याचे साधन झाले आहे की काय अशी देखील शंका वाटू लागली आहे. 

मी 40 वर्षा पासून कधीही बदला म्हणून राजकारण केले नाही. वैचारिक दृष्ट्या पराभव न करता मानसीक शाररिक संपविणे सारखे त्याचा प्रवास हा सुरू झाला आहे. हे धोकादायक असून समाजाचा विश्वास उडविणारा प्रकार आहे.राजकारण आणी पत्रकारिता हे समाज उपयोगी पध्दतीनेच झाले पाहिजे. कोणाला आवडेल अशी पत्रकारिता न करता वस्तुनिष्ठ तटस्थ पत्रकारिता ही समाज हिताची आहे.आणि ती तशीच करावी अश्या अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. प्रसंगी उपस्थित पत्रकारांचा त्यांचा हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम सूत्रसंचालन व आभार प्रा आर बी पाटील यांनी मानलेत.

 

Protected Content