खामगाव प्रतिनिधी । उद्या दि.१० ऑगस्ट रोजी होणाऱ्या संपाबाबत आज दि.९ ऑगस्ट रोजी विभागीय कार्यालयासमोर वीज कामगार, अभियंता, अधिकारी यांच्या संयुक्त संघर्ष समितीची बैठक झाली.
या सभेला कॉ.सी.एन देशमुख महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसटी वर्कर्स फेडरेशन, दिलीप वक्ते सब ऑर्डीनेड इंजिनियर्स असोसिएशन, प्रमोद हेलोडे मागासवर्गीय युनियन, गणेश परदेशी इंटककडून सभेला मार्गदर्शन केले
सर्व कामगार – अभियंते- अधिकारी यांनी उद्याच्या संपात 100%भागीदारी करून केंद्र सरकारच्या येऊ घातलेल्या वीज कायदा 2021ला जबरदस्त विरोध करावा व कामगार एकजूट दाखवावी, असे आवाहन केले आहे. तसेच यावेळी सभेला खामगाव विभातील कामगार अभियंते अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सभेचे संचालन सुनील जवंजाळ यांनी केले.