नागरिकत्व सुधारणा कायदा : जळगाव मुस्लीम मंच आणि विविध संघटनांचे आंदोलन (व्हीडीओ)

1123

 

जळगाव प्रतिनिधी । जळगाव मुस्लीम मंच आणि इतर संघटनांनी एकत्रितपणे नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला असून या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे राजेंद्र खरे,प्रतिभाताई उबाळे यांनी आक्रमक भाषण केले.

 

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जळगाव मुस्लिम मंच,समाजवादी पार्टी,एमआयएम, मनियार बिरादरी, मौलाना आज़ाद विचार मंच,अलफैज़ फॉउंडेशन, अमन एजुकेशन, अमन फॉउंडेशन, जन नायक, लकी फॉउंडेशन, आयडियल, मीर शुकरुल्ला, ईशान फाउंडेशन, रौशनी फॉउंडेशन,हॉकर्स यूनियन, मौलाना अबुल कलाम आजाद, नॅशनल स्पोर्ट्स, आदी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तर पोलिसांचाही तगडा बंदोबस्त होता.

 

Protected Content