पालिका आयुक्तांवर हल्ल्याचा प्रयत्न – पालिका कर्मचाऱ्यांचा कामबंद करण्याच्या पवित्रा

औरंगाबाद – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय कार्यालयातून बाहेर येत असताना पाणी प्रश्नावरुन दोन जण त्यांच्या अंगावर धावून गेल्याची घटना औरंगाबाद येथे घडली असून या प्रकारामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करण्याच्या पवित्रा घेतला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी कि, “गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून याविषयी निवेदन देण्यासाठी राहुल इंगळे आणि त्यासोबत एकजण औरंगाबाद आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना निवेदन देण्यासाठी औरंगाबाद पालिकेत आले होते. तेथे त्यांच्यात शब्दिक चकमक होऊन त्यानी आयुक्त बाहेर येत असतांना त्यांच्यावर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला.” असे महानगर पालिकेकडून पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

याविषयी राहुल इंगळे याचं मत वेगळं होतं. त्यानी, “आम्ही हल्ला करण्यासाठी नाही तर आयुक्तांना पाणी प्रश्नाविषयी निवेदन देण्यासाठी भेटायला आलो होतो. आयुक्तांनी सोबत असलेले कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांनी आमचे म्हणणे न ऐकले नाही. असे म्हटले आहे.

यावर औरंगाबाद महापालिकेचे कर्मचारी त्यांनी “जर हल्ला होण्याचा प्रयत्न केला जात असेल तर काय करायचं ?” असा प्रश्‍न उपस्थित असं म्हणत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा पवित्रा घेतला आहे. आस्तिककुमार पांडेय यांनी या अगोदर जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सांभाळल्यानंतर आता तेऔरंगाबाद येथे महापालिका आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

अनेक दिवसांपासून औरंगाबाद येथील प्राणी प्रश्न आहे. यासाठी अनेकांनी आंदोलनेही केलीत. आठ दिवसात फक्त ४५ मिनिटं पाणी येत. भर उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. अशा प्रकारे पाणीटंचाईचा प्रश्न असल्यामुळे जनतेचा आक्रोश वाढत असून त्याचे रूपांतर अशा घटना घटनात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आयुक्तांवर हल्ला होणे योग्य नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न लक्षात घेता कुणावरही हल्ला चुकीचाच आहे.

या संदर्भात महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी औरंगाबाद शहर चौक पोलीस स्टेशनला हल्ल्याची तक्रार दाखल दिली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!