मारेकर्‍यांना फाशी द्या : सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची मागणी (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । मानवतेला काळीमा फासणाऱ्या उत्तर प्रदेश हाथरस येथील मनीषा वाल्मिकी च्या मृत्यूची त्रिसदस्यीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी व दोषींना मृत्युदंडाची शिक्षेची मागणीसाठी सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

दिल्ली, कठुआ, हैदराबाद, उन्नाव व आता उत्तर प्रदेशातील हाथरस येथे चार नराधमांनी निष्पाप मुलीचे शेतातून अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्यानंतर पीडितेची जीभ छाटून, पाठीचा मणका मोडून तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून गळ्यात ३ फ्रॅक्चर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले. पंधरा दिवस मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली. घटनेच्या निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यास व फक्त बलात्कार प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा करण्याकरिता कायद्यात दुरुस्तीची मागणी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे सरिता माळी कोल्हे, गजानन मालपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला पाटील, वाल्मिकी मामा पाटील, कम्युनिष्ट पार्टीचे जे. बी. ठाकरे, मराठा सेवा संघाचे मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र बागरे, ललित कोरोसीय, वैशाली झाल्टे, जय ढंढोरे, आनंद सोनवल, मनोज पांडे, ललित शर्मा, राजेशभाई गोयर, सुरेशभाई चांगरे, किरण राजपूत, राहुल पारचा , दिलीप सुरवाडे, सूर्यकांत पाटील, हर्षल तेजकर , लखन सांगिले यश घुसर, जयप्रकाश चांगरे, उमेश तायडे, राहुल गवळी, यश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/347845386657438

 

Protected Content