जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या अगस्त्य बॅचतर्फे आयोजित समन्वय २के२५ चा मोठ्या थाटात शुभारंभ झाला. सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या तृतीय वर्ष अगस्त्य बॅचतर्फे आयोजित समन्वय २के२५ चे हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया आर्वीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, मेडीसीन विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रय्या कांते, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्या विशाखा गणवीर, होमीओपॅथी महाविद्यालयाचे डीन डॉ. आर.के. मिश्रा, डॉ. चैतन्य पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशी आर्ट गॅलरीचे आयोजन करण्यात आले होते.
पात्र दिनावर आधारीत या आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शिक्षक समन्वयक डॉ. कैलाश वाघ, अब्दुल्ला सर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रचेता मुकुंद, सुयश देशपांडे यांनी केले. कलादालन आयोजन समितीत साहील निंगुरकर, राज पवार, वैष्णवी कावरे, सानिया कांबळे, अक्षदा वानखेडे, स्वागत समिती: पियुष चिंचकर, देवांशू बाणासुरे, ओमप्रकाश मुटकुळे, शिवराज दाभाडे, राजश्री बनकर, गौरी हाडे यांनी परिश्रम घेतले. सायंकाळी डॉ. केतकी पाटील सभागृहात ढोलताशांच्या गजरात सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर कॉस्प्ले कार्यक्रमात ३० जणांनी सहभाग नोंदविला. विविध चित्रपटाशी संबंधित ११ टेबल साकारण्यात आले होते. मान्यवरांनी या कलादालनाची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
दुसर्या दिवशी टॅलेंट शोचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वैद्यकीय संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, प्रा. बापुराव बिटे, डॉ. सी.डी. सारंग, डिन डॉ. आर.के. मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले. त्यात खुशी सुराणा हिने प्रथम, द्वितीय भावेश जाधव, तृतीय क्रमांक स्वरूप काळेकर याने पटकविला. या तीनही विद्यार्थ्यांसह गत आठवड्यात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.