डॉ. सतीश पाटलांच्या गावात शिवसेनेचा गजर : ग्रामस्थांचा पक्ष प्रवेश

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी मंत्री डॉ. संतीश पाटील यांचे मूळ गाव अर्थात तामसवाडी येथील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

तालुक्यातील तामसवाडी येथील माजी पोलीस उपनिरिक्षक चुडामण साहेबराव पवार यांचेसह असंख्य ग्रामस्थ व माता-भगिणींनी आमदार चिमणराव पाटील व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे आमदार चिमणराव पाटील यांनी शिवसेनेत स्वागत केले.

नुकताच तामसवाडी येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सभोवतातील गावांचा होत असलेला सर्वांगिण विकास तसेच आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांतुन व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या संकल्पनेतुन तामसवाडीत प्रथमच ८० लाखांपेक्षा अधिकची विकासकामे सुरू आहेत. आबासाहेब व दादासाहेब यांचा दुरदृष्टीने प्रथमच गावाला एवढा निधी प्राप्त झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

याप्रसंगी जि.प.मा.कृषि सभापती डा.दिनकर पाटील, मा.जि.प.सदस्य पांडुनाना पाटील, देवगांव सरपंच समिर पाटील, पं.स.मा.सभापती वसंतआप्पा पाटील, शेतकी संघाचे मा.उपाध्यक्ष सखारामन चौधरी, दासभाऊ पाटील, शिरसमणी सरपंच विजुनाना पाटील, तामसवाडी येथील पंजाबराव पवार, गोविंद पवार, दिलीप बिरारी, गुलाब पवार, सतिष पवार यांचेसह आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content