राणेंची जन आशीर्वाद यात्रा नव्याने सुरू; शिवसेनेवर बोलणे टाळले !

रत्नागिरी प्रतिनिधी । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून सुरु झाला असून त्यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेचा उल्लेख टाळला आहे. 

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसांची ही यात्रा असणार आहे. शुक्रवारी नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्‍यांची भेट घेत संवाद साधला आहे. यावेळी नारायण राणे यांनी कोकणातील शेतकर्‍याशी संवाद साधताना आशिर्वाद द्यावेत यासाठी मी तुमच्याकडे आलो असून तुम्ही सर्वांनी जे स्वागत केलं त्याबद्दल मी तुमचा अतिशय ऋणी आहे असे म्हटले आहे. आपल्या या भाषणात त्यांनी शिवसेनेवर अवाक्षरही काढले नाही. 

नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेचं महत्त्व समजून सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात आणलेल्या योजनांची माहितीही दिली. यावेली आंबा-काजू बागायतदार संघाकडून राणेंचा गोळप गावी सत्कार करण्यात आला.

तुमचे आशिर्वाद घेण्यासाठी मी रत्नागिरीला आलो आहे. मी एवढंच सांगेल तुमचे निवेदन मला मिळाले आहे. याचा पुरेपुर अभ्यास करुन तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. एक बागायतदार मला आत्महत्या करेल असं म्हणाला. मात्र मी कुणाही व्यक्तीला आत्महत्या करू देणार नाही. मी एका महिन्याच्या आत अधिकाऱ्यांना घेवून येईल आणि तुमचे प्रश्न सोडवणार, अशी ग्वाही राणेंनी दिली. मात्र, या दहा मिनिटाच्या भाषणात राणे यांनी शिवसेनेवर किंवा राज्य सरकारवर टीका केली नाही.

Protected Content