अक्षय तृतीयेला महाआरत्या: सात ते आठ संघटनाचा पाठींबा

मुंबई/पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज ठाकरे यांच्या १ मे महाराष्ट्र दिनी होणाऱ्या औरंगाबादच्या जाहीर सभेकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष आहे. तर त्यांनंतर ३ मे रोजी तारखेला रमजान ईदसह अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुणे शहर मनसेकडून पुण्यातील सर्व मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मंदिरामध्ये होणाऱ्या महाआरत्याना विहिप, बजरंग दल सह अन्य संघटनानी पाठिबा दर्शवला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा तसेच पुणे मुंबईतच्या सभेत भोंग्यांसंदर्भात भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोपां होत असून १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा होत आहे. तर दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल्यानुसार पुण्यातील सर्व मंदिरात तीन तारखेला महाआरतीचे नियोजन केले जात असून शहरातील सर्व मंदिरात सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेबारा या दरम्यान आरती केली जाणार आहे. तसेच आज शुक्रवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह अन्य सात ते आठ संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून तेही या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती मनसेचे नेते अजय शिंदे यांनी दिली.

Protected Content