संतापजनक : चिमुकलीवर अत्याचार ; नराधमाला अटक

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ! पारोळा तालुक्यातील पिंप्री शिवारातील एका शेतात ९ वर्षाच्या चिमुकलीचे तोंड दाबुन अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे.

विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील पिंप्री शिवारातील एका शेतात कुटुंबिय वास्तव्याला आहे. रविवार १० मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी आणि तिचा भाऊ शेतात काम करत असतांना त्याठिकाणी हिरालाल अमरसिंग बारेला रा. शेनपाणी ता. चोपडा हा तिथे आला. त्यावेळी संशयित आरोपी हिरालाल याने पिडीत मुलीच्या भावाला लिंबू घेण्यासाठी बाहेर पाठविले. त्यावेळी ९ वर्षाची चिमुकली ही एकटी असतांना नराधम हिरालाल बारेला याने पिडीतेचे तोंड दाबून अत्याचार केला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पिडीत मुलीसह तिच्या आईने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी हिरालाल बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी संशयित आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहे.

Protected Content